पर्यावरणचे संरक्षण आणि संवर्धनास समाजातील प्रत्येक घटाकांचा हातभार लागणे आवश्यक आहे. यासाठीच ‘जागतिक पर्यावरण दिन ’- ५ जून २००९ चे निमित्त साधून पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र (ENVIS), पर्यावरण विभागामार्फत राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संबंधित विविध विषयांबाबत निबंध, छायाचित्र, घोषवाक्य या गटात समाजातील सर्व स्तरातून प्रवेशिका मागविण्यात आल्या. सदर स्पर्धेला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. पर्यावरणबद्दलची जागृती ही केवळ मोठया शहरापूरतीच मर्यादीत न राहता ती छोटया गावांत तसेच ग्रामीण भागात देखील आहे, ही बाब त्या भागातील लोकांकडून प्राप्त झालेल्या प्रवेशिकांवरुन स्पष्ट झाली. या स्पर्धेतील सर्व पारितोषिक विजेत्या लेख, घोषवाक्ये, निबंध आणि छायाचित्रे यांचे संकलन "जनमानसातील पर्यावरण" या संकलिकेद्वारे करण्यात आले.
या संकलिकेचे प्रकाशन मा. श्री. अशोकरावजी चव्हाण, मुख्यमंत्री यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिन, दि. ५ जून २०१० रोजी करण्यात आले. ही संकलिका आपल्या सर्वांसाठी खाली उपलब्ध करून दिली आहे.