Green Ganesha-Meeting with Ganesh Mandals
Meeting with Ganesh mandals
Making Environment-friendly idols
 
 
 
 Eco-friendly Idols & Decoration Availability
Green Steps-Green Ganesha campaign
 Celebrating Ganesha festival: Right approach
Speech by The Secretary (Environment)
during meeting with Ganesh Mandals

गणेशोत्‍सव पर्यावरणपूरक पध्‍दतीने साजरा करण्‍यासाठी आपण सहा महत्‍वाच्‍या गोष्‍टीचा विचार करायला हवा –
१. गणेशमूर्ती – गणेशमूर्ती ही पाण्‍यात लगेच विरघळणारी आहे का?
२. गणेशमूर्तीचे रंग – या रंगांमध्‍ये घातक विषारी धातू असलेल्‍या रंगांचा वापर केला आहे का? त्‍यामुळे पाण्‍यातील परिसंस्‍थेवर तसेच आपल्‍या आरोग्‍यावर परिणाम होतो आहे का?
३. निर्माल्‍य – निर्माल्‍याचे विसर्जन करताना योग्‍य पध्‍दतीने व्‍यवस्‍थापन केले जाते का?
४. गणेशमूर्तीची सजावट ही पर्यावरणपूरक आहे का? थर्मोकॉलचा वापर टाळून कागद किंवा कागदी लगदयाच्‍या वापर केला जातो का?
५. गणेशोत्‍वसाच्‍या काळात ध्‍वनीची पातळी ही नियमांना अनुसरुन पाळली जाते का?
६. गणेशमूर्तीचे विसर्जन कोठे केले जाते? ते करतांना केंद्रिय व महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्‍या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाते का?

          याबाबत विचार करुन योग्‍य त्‍या गोष्‍टींचा अवलंब केल्‍यास, आपले शहर आणि आपले सण पर्यावरणपूरक बनविण्‍यासाठी आपण एक महत्‍वाचा वाटा उचलणार आहोत.हे करताना नियमांत बदल करुन ते लादण्‍याचा आमचा विचार नाही. याऐवजी या प्रक्रियेतील महत्‍वाचे stakeholder (घटकपक्ष) म्‍हणून आपली मते जाणून घेऊन याकामी मला आपले सहाकार्य हवे आहे.

          आता आपण यातील प्रत्‍येक बाबीचा वेगळा विचार करुया. महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बनविलेल्‍या मार्गदर्शक सूचना आपणा सर्वांना बर्‍याच आधी पाठविण्‍यात आल्‍या आहेत.मागच्‍या वर्षी या मार्गदर्शक सूचना आम्‍ही राज्‍यातील सर्व स्‍थानिक प्रशासनाला पाठविल्‍या होत्‍या आणि त्‍यांच्‍याकडून आम्‍हाला चांगला प्रतिसाद मिळाला. म्‍हणूनच या वर्षी हया प्रकल्‍पाची व्‍याप्‍ती वाढविण्‍याचे आम्‍ही ठरविले आहे.

          आपल्‍या सगळयांना माहितीच आहे की शाडूच्‍या मातीपासून बनविलेल्‍या गणेशमूर्ती हया जास्‍त पर्यावरणपूरक आहेत, आणि म्‍हणूनच मी तुम्‍हा सर्वाना घातक अशा प्‍लास्‍टर ऑफ पॅरिसचा (POP)वापर हळूहळू कमी करण्‍याचे आवाहन करते. POP हे आपल्‍या हवा आणि पाणी यांसाठी खूप हानिकारक आहे. आज आपण श्री. पालव यांच्‍याकडून गणेशमूर्ती बनविण्‍याच्‍या पर्यावरणपूरक पध्‍दतीचे प्रात्यक्षिक बघणार आहोत. सर्व मूर्तीकारांनी ही पध्‍दत लक्षात घेऊन त्‍याबाबत विचार करावा असे मी आवाहन करते.

          गणेशमूर्तीच्‍या रंगांच्‍या बाबतीत बोलायचे तर हे जाहिर करताना मला अतिशय आनंद होत आहे की, महत्‍वाच्‍या रंग निर्मिती करणार्‍या कंपन्‍यांनी आधीच पर्यावरणपूरक पावले उचलली आहेत. Asian Paints, Nerolac, Camlin and Pidilite या कंपन्‍यांच्‍या प्रतिनिधिंशी माझी चर्चा झाली आहे. कमी VOC व APO नसलेले, म्‍हणजेच Lead Arsenic आणि Chromium यासारखे घातक धातू नसलेले आणि पाण्‍यात विरघळणारे रंग (emulsion paints)या कंपन्‍यामार्फत उपलब्‍ध होणार आहेत. या रंगावर Heavy Metal Free असे लिहिण्‍यात येईल. आरोग्‍यासाठी हितकर असणार्‍या अशा रंगांचा वापर करण्‍यासाठी मी सगळयांना विनंती करते. याच प्रमाणे थर्मोकॉललाही पर्याय उपलब्‍ध आहे. प्रदूषण टाळण्‍यासाठी थर्मोकॉल ऐवजी कागदी लगद्याचा वापर करता येईल.

           फुले आणि देवाला वाहिलेल्‍या इतर गोष्‍टी योग्‍य पध्‍दतीने जमा करुन त्‍या मुंबई महानगरपालिकेच्‍या विघटनशील कचर्‍याचे व्‍यवस्‍थापन करणार्‍या यंत्रणेकडे पाठविणे आवश्‍यक आहे.याबाबत मुंबई महानगरपालिकेचे काम कौतुकास्‍पद आहे तसेच मुंबई महानगरपालिका ही पर्यावरण दृष्‍टया सर्वात सजग/जागृत पार्टनर आहे, असे म्‍हणता येईल.

          गणेशोत्‍सवा दरम्‍यान करण्‍यात येणारा ध्‍वनी प्रक्षेपकांचा वापर ही अजून एक चिंतेची बाब आहे. ध्‍वनी प्रदूषण नियंत्रण नियमांच्‍या धर्तीवर,याबाबत आपण सगळयांनीच वैयक्तिक स्‍तरावर प्रयत्‍न करणे गरजेचे आहे, जेणेकरुन कोणत्‍याही नियमन करणार्‍या यंत्रणेची गरज भासणार नाही.याबाबत आपण सगळयांनीच मुंबई पोलिसांना सहकार्य करायला हवे.

          दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ Times of India च्‍या मदतीने पर्यावरणपूरक गणपतीसाठी बक्षीस देणार आहे.

          या मार्गाने जाण्‍यासाठीच्‍या आपल्‍या सगळयांच्‍या एकत्रित प्रवासातील, ही पहिली पायरी आहे.

          तुमच्‍या सगळयांची याबाबतीतची मते तसेच सहकार्य आम्‍हाला नक्‍कीच मिळेल अशी मी आशा करते.


गणेश मंडळांबरोबरच्‍या बैठकीची छायाचित्रे :

 Celebrating Eco-friendly Ganeshotsav
Guidelines
 
 
 List of Artificial tanks for immersion
 Immersion Statistics
 News in Media
 

Back