 |
इको-फ्रेंडली गणेशोत्सव |
गणेशोत्सव हा भारतीय संस्कृतीतला असा सण - ज्याला धार्मिक तसेच सामाजिक महत्त्व आहे. सकल कलागुणांची, विद्येची देवता असलेल्या गजाननाचे पूजन घरोघरी वर्षानुवर्षे होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव तर आपल्याकडे दरवर्षी फार उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाचे स्वरूप, साजरीकरणाची पद्धत काळाच्या ओघात फारच बदलत चालली आहे.
गणेशोत्सवाच्या या आधुनिक स्वरूपाचा पर्यावरणावर, आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता, आजचा गणेशोत्सव खरोखर कालानुरुप होण्यासाठी मूर्तीच्या आकारापासून ते मूर्ती बनविण्यासाठी वापरलेल्या घटकांपर्यंत आणि मूर्तीच्या भोवती उभारलेल्या सजावटीपासून ते विसर्जनापर्यंत सर्वच बाबतीत पुनर्विचार करायला हवा. आपला गणपती ‘पर्यावरण स्नेही’ असेल आणि गणेशोत्सव समाजाभिमुख असेल तर तो ख-या अर्थाने आजचा गणेशोत्सव ठरेल. खाली दिलेल्या काही पर्यायांचा यासाठी आपण नक्कीच विचार करू शकतो:
-
मध्यम आकाराच्या शाडूच्या मातीपासून अथवा कागदी लगद्यापासून बनविलेल्या गणेशमूर्तींची स्थापना करावी.
-
गणपतीच्या सजावटीमध्ये थर्माकोल, प्लॅस्टिक अशा वस्तूंचा वापर शक्यतो टाळावा व वापर केल्यास त्याच्या पुनर्वापराकडे नक्कीच लक्ष द्यावे. बांबू, कागदी फुले, पडदे, अशा नैसर्गिक वस्तूंचा वापरत करूनही आपण सुंदर सजावट करु शकतो.
-
गणेश मूर्ती नदी, तलाव अथवा समुद्रात न विसर्जित करता कृत्रिम हौदांचा वापर करावा, अथवा छोटया गणेशमूर्तींचे विसर्जन आपल्या घरीच बादलीत करावे, हे पाणी बागेतील झाडांना देऊ शकतो.
-
तसेच पूजेसाठी वापरण्यात आलेली फुले, पत्री ही जलसाठयात न विसर्जित करता निर्माल्य कलशांमध्ये टाकावीत जेणेकरुन त्याचा वापर खतनिर्मीतीसाठी होऊ शकतो.
-
अनावश्यक रोषणाई टाळण्याचा प्रयत्न करावा.
-
गणपतीचे विसर्जन न करता सुपारीचे प्रतिकात्मक विसर्जन करावे.
|

इको-फ्रेंडली मखर |
इको-फ्रेंडली / पर्यावरणपूरक गणेशमूर्ती म्हणजेच शाडूच्या मातीपासून अथवा कागदाच्या लगद्यापासून बनविलेल्या, रासायनिक रंगांचा वापर नसलेल्या गणेश मूर्ती. तसेच या गणेशमूर्तींना रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगांचाच वापर केला जातो, जसे गेरू, हळद, कुंकू. अशा गणेश मूर्ती तसेच इको-फ्रेंडली मखर आता बर्याच शहरांमध्ये उपलब्ध असतात.
शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविणे -चित्रफित (video)
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती - संपर्कासाठी काही पत्ते:
- मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘इको-फ्रेंडली गणपती – प्रदर्शन व विक्री’, स्थळ: भारत स्काऊट आणि गाईड हॉल, शिवाजी पार्क, दादर
संपर्क:
- श्रीमती मीनल लेले, शॉप न. 14, शिवतीर्थ अपार्टमेंट, पारनाका, कल्याण (पश्चिम) -421301, मो: 9769485959
- श्री. मारूती पालव, कणकवली, मो: 9820754910 / 9423884468
- श्री. कैलास दसले, इको-फ्रेंडली मखर, हेरंब आर्टस्, राममारूती रोड, शिवप्रसाद हॉटेल समोर, ठाणे.
या ठिकाणी उपलब्ध गणेशमूर्ती कागदी लगदा, शाडूची माती यांचा वापर करून बनवलेल्या असून आकर्षक बनविण्यासाठी वॉटर कलरने त्यांना रंगवले आहे. तसेच इथे इको-फ्रेंडली मखर देखील उपलब्ध आहेत, जे तयार करताना बांबू, ज्यूट, कागदी फुले यांचा वापर केला आहे.
- पुणे येथे कार्यरत असलेल्या ‘इको-एक्झिस्ट’ या पर्यावरणविषयक काम करणार्या संस्थेनेदेखील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवल्या आहेत. शाडूच्या मातीपासून बनविलेल्या या गणेशमूर्ती गेरू, हळद, मुलतानी माती यांचा वापर करून रंगविल्या आहेत. या मूर्ती मुंबई, पुणे व हैदराबाद या शहरांमध्ये खालील पत्त्यांवर उपलब्ध आहेत: (‘इको-एक्झिस्ट’ या संस्थेचे संकेतस्थळ: http://www.e-coexist.com)
पुणे :
- Sohrab Hall, 26050225 / 56017666
- Nilaya Bandhej, Senapati Bapat Road, 9422306673
- eCoexist, Kalyani Nagar, 9850084383
- Oikos, Kothrud, 65289576
मुंबई :
- Dhoop crafts, Khar ,
Plot no 27A, Ground floor, 21st Road, Dandpada, Khar, Mumbai 400052, ph :(022) 65819351/ 52 or 32421265
- Green Ways, Pedder Road,Nikhil villa, 19 Carmichael Road, Mumbai 400 026, Mob.- 09820562063
- Ramesh Sheth, Andheri, 09869254935
- Radhika Arora, Juhu, 6 Vasant Park, Janaki Kutir, Juhu Church Road, Mumbai 400049, Mob.- 09821017349
- Suriti Culture Shop, Powai,Level 2, Haiko Mall, Central Avenue, Hiranandani Gardens, Powai, Mumbai 400052, ph no: 022 66939777
- Heena Choksi, Borivali, C Wing, Flat No.502, Bldg - RNA Millennium Township,
M.G Road, Kandivalli West, Mumbai-67, Mob.- 09833664750
- Shefali / Javin Bhinde, Wadala,
Mount Alps B Wing, Bhakti Park, Wadala (E), Mumbai - 37,
Tel: 2403 6944, Mob.-98671 94451 / 76701
- Anand Pendharkar, Sprouts Earth Shop 5, Pawar Shops, Rani Sati Marg, Malad East, Mumbai 97, Mob.- 9820140254
हैदराबाद :
- Daram, Lata 9849023417
Naik's Estate, ICICI Bank Lane, Beside Aiport Lane, Begumpet, Hyderabad, Tel: 040 27765503
|